Thursday, June 24, 2010

या कुत्र्यांना आवरा...


या कुत्र्यांना आवरा...

काल रात्री मी बाहेर जात होतो, तेवढ्यात माझा मित्र शंतनु ऑफिसमधून आला... म्हणाला "अरे, आत्ता येताना गल्लीतला कुत्रा चावला... म्हणजे तो अंगावर आला म्हणून मी बचावाचा प्रयत्न केला, तर त्याचा दात लागला."

रात्रीचे ११ वाजले होते. जखम ब-यापैकी होती. त्याला लगेच घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो... डॉक्टरांनी ताबडतोब रेबिपूर नावाचं रेबीजचं इंजेक्शन दिलं. त्वरीत उपचार झाले.

सध्या हे रस्त्यावरचे भटके कुत्रे खूप वाढले आहेत. मी रात्री उशीरा माझी कामं आटपून येतो, त्यावेळी हे कुत्रे अंधारातून अचानक कुठूनतरी बाहेर येतात आणि अंगावर येतात... बरं या कुत्र्यांपासून बचाव करावा तर गाडीवरून धडपडण्याची भीती, नाही बचाव केला तर कुत्रं चावण्याची भीती... आज पर्यंत मी स्व:ताला या कुत्र्यांपासून वाचवत आलोय... तरी देखील मला नाही; पण मित्राला कुत्रा चावलाच.

बरं, या कुत्र्यांना मारून टाकावं; तर आपले गाढवी कायदे मध्ये येतात... (कायदे चांगले की गाढवी हे ठरवायला मी कोणी कायदेपंडीत नाही; पण एक ‘कॉमन मॅन’ म्हणून मी माझं मत मांडतोय. )

जेव्हा मुक्या प्राण्यांच्या बाजूने कायदा आला, तेव्हापासून ह्या कुत्र्यांचा त्रास खूप वाढलाय... कायदा योग्य आहे... पण तो या भटक्या कुत्र्यांच्या बाजूने आहे का? त्यांना कोण आवरणार? पूर्वी या कुत्र्यांना पकडून मारून टाकायचे... पण आता म्हणे त्यांची नसबंदी करतात... नसबंदी करून- करून अश्या किती कुत्र्यांची नसबंदी करणार? आणि नसबंदी केल्यावर ते कुत्रे चावण्याचं थांबणार आहेत का? नाही... ते मरेपर्यंत चावतच राहाणार... (पण खरंच या कुत्र्यांची नसबंदी होते का हो?)

म्हणजे आपल्याला कुत्रा चावला, तर आपण त्याला मारायचं नाही... मारलं तर आपल्यावर खटला भरला जातो; पण कुत्रा चावून एखाद्याचं बरं- वाईट झालं; तर त्या कुत्र्यावर खटला भरणार आहेत का?

आज रेबिजवरच्या ३ इंजेक्शनच्या कोर्सचा खर्च रू. १५००/- च्या घरात जातो... खर्च करण्याची कोणाची ऐपत असली, कोणाची नसली तरी तो करावाच लागतो. कुत्रा असं बघून चावत नाही की, "अरे, याच्याकडे खूप पैसे आहेत, चला आज आपण याला चावूया..." हा खर्च हे सरकार देणार आहे का?

आता किमान यावरतरी सरकारने काहीतरी करावं... नाहीतर शेवटी लोकांचा संयम सुटला तर ते यांच्या घरात कुत्रे सोडायला मागे- पुढे पाहणार नाहीत...

5 comments:

 1. Are dhanya ratri beratri ase ektyane phiru naye...
  aaj kutri udya anakhi kahi...

  aso..
  kutryancha kayda .... apan bapadi manase...

  ani tuzya mitrala sanag tya kutryawar laksha thevayla jo tyala chavla... tyalapan tar injection dyawe lagel na... bhootdaya asavire...
  aso.. gammat keli

  are pan hi kutri mhanje bhutatki astat ratri ushira yayche asel tar hatat ek kathi thevevi...
  disla kutra ki mar ... ase salag sat divas karave.. nantar .. pudhchya atavdyat .. ek kutra disnar nahi...
  aso barech lihayche hote pan nantar lihito...

  ReplyDelete
 2. Bindok bhutadayavaadi lok aahet toparyant kaay karnaar mitra? Pan tu blogvar vaacha fodlis he bare keles.

  ReplyDelete
 3. yogesh, aata ya kutryaancaa bandobast aapanch karaila hava... tu mhantos tasa kaathee gheun... :-)

  Mandaar, bhootdayavaadi lokanvarach kutri sodaila havit.. kalel tyana ki, he bhuta kashi daya daakhavataat... ;-)

  ReplyDelete
 4. माझे बाबा, काका चक्क हातात काठी घेऊनच जातात बाहेर. ( रात्री बेरात्री जायची वेळ आली तर ) आजकाल दिवसाही ही मोकाट भटकी कुत्री झुंडीने अंगावर येतात. मला तर नुसते लांबून पाहूनही धडकी भरते. :( एक तर मुर्खासारखे कायदे करतात व नेमके नको तेच बरोबर अमलातही आणतात. काहीतरी करायलाच हवेय या प्रश्नावर....

  ReplyDelete
 5. congurelation for your award in air purifying invention i would like to know more about you invention i want to contact you but would like to contact you can you sms me you cell number or your email address at below number
  Name : Jaiprakash Dhanani
  Cell : 09820686048

  ReplyDelete