Monday, June 7, 2010

खवय्यांसाठी : अस्सल कोल्हापुरी खासबाग मिसळ आता पुण्यात


खवय्यांसाठी : अस्सल कोल्हापुरी खासबाग मिसळ आता पुण्यात

कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो रंकाळा- पन्हाळा, महालक्ष्मी अंबाबाई, शाहू महाराज, कुस्त्यांचं खासबाग मैदान......

आणि तोंडाला पाणी सुटतं ते म्हणजे झणझणीत मटण, तांबडा- पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी मिसळ यांनीच.

अशा या रांगड्या कोल्हापुरात, पैलवानांच्या खासबाग मैदानाजवळ गेल्या ७० वर्षांपासून ‘खासबाग मिसळ’ आहे... स्वातंत्र्यपूर्व काळात १९३९-४० मध्ये कै. श्री. जयराम भिकाजी ढोले यांनी सुरू केलेले टपरीवजा हॉटेल सोबत काम करणारे त्यांचे मानसपुत्र कै. श्री. महादेव दत्तोबा बुचडे यांच्या सुपुर्द केले.

श्री. बुचडे यांनी १९४५ साली टपरीसमोरील जागा घेऊन तेथे ‘खासबाग मिसळ’ सुरू केले. चटकदार मिसळ, आणि श्री. बुचडे यांच्या बोलक्या आणि लाघवी स्वभावामुळे हे हॉटेल गेली ७० वर्षे यशस्वीपणे चालू आहे...

आता त्यांची तिसरी पिढी.... तीन भावंडं कोल्हापुरात व्यवसाय सांभाळत असताना, कोल्हापुरला कामानिमित्तं जाणा-या काहीजणांनी पुण्यात शाखा चालू करावी असा आग्रह धरला...

त्यानुसार तीन भावांपैकी एक श्री. अमर बुचडे यांनी पुण्यात सिंहगड रोडवर ‘खासबाग मिसळ’ याच नावाने शाखा सुरू केली...

मला मुळातच मिसळ खूप आवड्ते... त्यात ही मिसळ जास्तं... त्याची कारणं म्हणजे, ही मिसळ खाल्यामुळे जळजळत नाही आणि खाल्यानंतर पोटात गच्चं बसत नाही... या बद्दल विचारलं असता त्याचं कारणही त्यांनी छान स्पष्टं केलं... ते मी आत्ता इथे देत नाही... ;-)

--

‘खासबाग मिसळ’

शिवनेरी बिल्डींग,

रीबॉक शोरूमच्यामागे,

पु. ल. देशपांडे उद्यानासमोर,

नवश्या मारूतीशेजारी,

सिंहगड रोड, पुणे.

8 comments:

 1. Kya baat hay dhanya
  amcha kolhapur ahec re lay bhari

  ReplyDelete
 2. tula mahit ahe na ki misal khalli ki
  2 divas khatya hatacha vaas jat nahi..
  ani jyala pachat nahi tyachya pudhe 5 divas dhutya hatacha vaas jat nahi.....
  ha ha ha .....

  ReplyDelete
 3. punyatla address madhye maruticha reference nehmich ka asto ha mala nehmi padnara prashna aahe ? ;) nice info...

  ReplyDelete
 4. punyat chauka- chaukamadhe maruti ahet...
  city area madhetar khupch... ani tyana vishishtha nava dili aslyane landmark mhanunsuddha maruticha upyog hoto... fakta marutich nahit, ganpati, vithoba vagaire...
  e.g. chimnya ganpati, pasodya vithoba, upashi vithoba, khoonya murlidhar... pan marutipeksha bakiche vishishtha naav vale dev tase kami ahet...

  ReplyDelete
 5. mast mast mast mi alo ki nakki bhet dein mala avdel mi tujha barobarch yein

  mast mast mast

  ReplyDelete
 6. *RAM PATIL....
  KAY BAT,KAY BAT,KAY BAT,KAY BAT,KAY BAT,KAY BAT,DHANYA TU KITI GOD AAHE.

  ReplyDelete
 7. mast tondala pani sutala pan kay karnar tikhat ani goad chalat nahi ata tari pan poonyala alo ki tav maren

  ReplyDelete