Tuesday, May 25, 2010

महाराष्ट्र देशा.... अप्रतिम पुस्तक...!!!


कालच मी उद्धव ठाकरेंचं ‘महाराष्ट्र देशा’ नावाचं अप्रतिम पुस्तक घेतलं...
एक उत्तम फोटोग्राफर.... धाडसी फोटोग्राफर म्हणजे काय, ते हे पुस्तक पाहिल्यानंतरच कळतं.
मी ‘पुस्तक पाहिल्यानंतर’ असं म्हणतोय, कारण या पुस्तकातले फोटो डोळे भरून पाहायचे... वाचायचे...
या पुस्तकातले सगळे फोटो ‘हवाई फोटो’ आहेत... ७००० फूट उंचावरून हेलिकॉप्टरचे दार उघडून केलेली फोटोग्राफी... वा-याला न जुमानता... एवढ्या उंचावरून एवढे चांगले फोटो काढणे म्हणजे धाडसाचंच काम आहे.
सर्व गड-किल्ले, लेण्या, महाराष्ट्राच्या आराध्यं दैवतांची ठिकाणं... नद्या, महामार्ग, शेती,
महानगरी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, विधान भवन, गणपती विसर्जन, भाऊचा धक्का... आणि खू.....प काहि.....
फोटोग्राफी इतकी सुंदर आहे की, बघणा-याची नजर विस्फारावी...
आपला महाराष्ट्र इतका सुंदर आहे... महाराष्ट्रात इतकी सुंदर ठिकाणं आहेत... ‘लय भारी...!!!’
फ़क्तं एवढीच विनंती आहे की, कोणत्या पक्षाचा नेता म्हणून पुस्तक न घेता, एक चांगला फोटोग्राफर, चांगला कलाकार म्हणून पुस्तक घ्यावं... पाहावं...
मुख्यं म्हणजे... हे पुस्तक हातात घेतल्यावर आपल्याला ६०० ते ७०० रूपयांचं वाटेल.... तसं आहेच ते... कारण सुंदर छपाई, उच्चं दर्जाचा पेपर... आकर्षक कव्हर आणि बांधणी...
परंतु सगळ्यांना विकत घेणं सोयीचं व्हावं यासाठी या पुस्तकाची किंमतही कमी आहे... रू. १४४/-.
मी उद्धव ठाकरे, शिवसेना, हे पुस्तक यांचा प्रचार करतोय असं बरेचजणांना वाटण्याची शक्यता आहे...
परंतु ही कलेची तारीफ़ आहे... कलाकाराची तारीफ़ आहे...
म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या संग्रहि असावंच असं ‘महाराष्ट्र देशा...!!!’

3 comments: