Sunday, May 9, 2010

पेट्रोलपंपवाल्यांपासून सावधान...!


हल्ली बरेचदा अनेक पेट्रोलपंपांवर पूर्ण पेट्रोल भरत नाहीत. म्हणजे समजा आपण १०० रूपयांचे पेट्रोल भरायला सांगितले तर ९९.८५ पैसे किंवा ९९.८० पैशांचेच पेट्रोल भरतात. म्हणजे प्रत्येकवेळी आपलेच १५-२० पैशांचं नुकसान होतं. मला दररोज किमान १०० रूपयांचं पेट्रोल भरावं लागतं... म्हणजे रोज १५ पैसे नुकसान व्हायला लागलं तर वर्षाचे जवळ जवळ ५० रूपये होतात... म्हणजे पंपवाल्यांना विनाकारण दान करण्यासारखं झालं. कशाला ? दानच करावसं वाटलं तर कोणत्यातरी सामाजिक संस्थेला, गरजू विद्यार्थ्याला करा...

कालच मी चांदणी चौक, मराठा मंदिर समोरील पंपावर पेट्रोल भरलं... त्याने १५ पैशांचं पेट्रोल कमी भरलं, पण त्याच्याशी भांडून ९९.८५ रकमेचंच कार्ड स्वाईप केलं. सोबत त्या मीटरचा फोटो जोड्ला आहे.

ही पेट्रोलपंपवरची लूटमार थांबवा...

5 comments:

 1. च्यायला हे पंप वाले नेहमीच असे करतात..कलेक्टीवली कीती पैसे असे चोरून कमावत असतील नाई..??

  ReplyDelete
 2. changle ahe yachyavar lihiles bare keles are he petrolpump wale chaluch astat tyanna 100.05 rs. che bharayla sanga katkat kartat mag ...apalyakadun 15 paise jast ghyayala laj vatat nahi...

  ReplyDelete
 3. नक्कीच... म्हणून मी तर अता भांडायलाच सुरुवात केली... पूर्ण पेट्रोल भर, नाही तर मर...!

  ReplyDelete
 4. आरे, तुम्हा सर्वांना एक विनंती आहे... जे कोणी Anonymous लिहीतात, त्यांनी please आपले नांव खाली लिहावे...

  ReplyDelete